पुण्यात जिवंत हॅन्ड ग्रेनेड सापडले

 पुणे : पुणे शहरात मेट्रोचे काम सुरू वेगाने सुरू आहे. सोमवारी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेरमध्ये मेट्रो लाईनसाठी खोदकाम सुरू असताना आयशर कंपनीच्या आवारात एका ठिकाणी जिवंत हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांसह बॉंम्ब शोध पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक पथकाने हे हॅन्ड ग्रेनेड तिथल्या तिथेच डिस्पोजही केले आहे.

बाणेर परिसर लोकांच्या वर्दळीने नेहमी गजबजलेला असतो. येथे लोकांची व वाहनांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अशा वर्दळीच्या ठिकाणी जिवंत हॅन्ड ग्रेनेड बॉंम्ब सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या परिसरात कुणी हॅन्ड ग्रेनेड जमीन पुरले होते. याची माहिती अजूनही समोर  आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

पुण्यात बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही धायरी परिसरात जिवंत बॉम्ब सापडला होता. नंतर तो बॉम्ब बॉम्बनाशक पथकाने नष्ट केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृष्य वस्तू सापडली होती. टनु गावात एका शेतकऱ्याला ही वस्तू सापडली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वस्तू ताब्यात घेतली होती.



Post a Comment

Previous Post Next Post