जिल्हा रुग्णालयात सिकलसेल सप्ताहाचा शुभारंभ

 


 अलिबाग (धनंजय कवठेकर) : जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय येथे सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहाचा आज शुभारंभ करण्यात आला. सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह दि.११ ते दि. १७ डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.

याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चेतना पाटील, डॉ.अनिकेत म्हात्रे, डॉ.प्रियांका गायकवाड, जि.आ.अ. कार्यालयाचे वडार, आनंद घरत, डॉ.वैशाली पाटील, डॉ.मोनिसा घोडके,अधिपरिचारिका श्रीमती भोपी, सहाय्यक अधिपरिचारिका  तारी, एमसॅक विभागाचे श्री.संजय माने आदी मान्यवरांसह ANM/ GNM च्या विद्यार्थिनी, रुग्ण व कुटुंबिय उपस्थित होते.

        उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.चेतना पाटील म्हणाल्या की, जिल्ह्यात सिकलसेल विषयी जनजागृती व तपासणीबाबत अधिक व्यापकरित्या कामकाज करून २०४७ पर्यंत देशातून सिकलसेलचे निर्मूलन करण्याचा उद्देश पूर्ण करू या असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर सिकलसेल जिल्हा समन्वयक प्रीती पाटील यांनी सिकलसेल आजाराविषयी उपस्थितांना माहिती दिली.

      या प्रसंगी सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार व प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीपा म्हात्रे यांनी उपस्थित गर्भवती महिला व अन्य रुग्णांची सोल्युबिलिटी तपासणी करून संपूर्ण माहिती देत समुपदेशन केले. आज ७२ नागरिकांनी तपासणी केली असून या सप्ताहात जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचारिका गावंड, ज्ञानदीप भोईर, अक्षय गोरे, साहिल म्हात्रे तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.





Post a Comment

Previous Post Next Post