अलिबाग, (धनंजय कवठेकर) : आपल्या न्याय्य हक्कासाठी जिल्हा सुरक्षा रक्षक अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याची आशा होती. हजारो तरुणांनी पात्रतेनुसार अर्ज केले होते. ३ हजार २०० जागांपैकी ७०० जागा भरण्यात आल्या. मात्र, अद्यापर्यंत २५०० भरती केलेले उमेदवारांना प्रत्यक्षात नोकरी मिळाली नाही. जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे वारंवार अर्ज विनंत्या करण्यात आल्या आहेत. परंतु कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या तरुणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. श्रमिक व असंघटित कामगार हक्क संघटनेच्या वतीने हा लढा सुरू केला आहे.
खोटे संदेश पाठवल्यामुळे सुरक्षा रक्षक यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. या खोट्या संदेशाच्या संदर्भात सुरक्षा रक्षक मंडळाने काय कारवाई केली. असे लेखी पत्रक मिळावे, आणि सुरक्षा रक्षकांचे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई व्याजासहीत संबंधित अधिकारी यांनी करावी. जिल्हाधीकारी यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार किती अस्थापना नोंदीत केल्या आहेत आणि दर महिन्याला किती सुरक्षा रक्षकांना कर्तव्यावर रुजू करण्यात आले. व मा. जिल्हाधिकारी यांच्या समेवत किती वेळा दर महीना अढावा बैठका करण्यात आल्या यांचा लेखी अहवाल मिळावा, तसेच जर मंडळात निरीक्षक कर्मचारी कमतरते अभावी कामे होण्यास उशीर होत असेल तर इतर मंडळा प्रमाणे खाजगी राऊंडर किंवा निरीक्षक का ठेवले नाहीत.
मागील पाच वर्षापासुन जे उमेदवार कर्तव्यावर पाठवण्यात आले. आशा उमेदवारांची शारीरीक, शैक्षणीक, त्यांचे मुळ निवासी पत्ता हे सर्व मुळ कागदपत्रे मिळावेत.
निर्देशामुळे तालुका निहाय सुरक्षा रक्षक प्रतिक्षा यादी बनवण्यात आली. ते लेखी निर्देश पत्राची प्रत मिळावी. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची भरती प्रक्रिया करावी आसल्यास, अधिनियम १९८१ च्या तरतुदीनुसार नवीन प्रतिक्षा यादी पूल किती टक्क्यांनी किंवा संख्येने भरती प्रक्रिया करता येते या संदर्भातील लेखी अहवाल मिळावा, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक यांनी किती अस्थापनावर न्यायालयीन दावे किंवा खटले दाखल केले व पाठपुरावा केल्याच्या मुळ प्रति निरीक्षक यांनी उपलब्ध करून द्यावेत. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
अध्यक्ष दिपक भवार, सरचिटणीस रवींद्र भले यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात उपाध्यक्ष सिकंदर कोळी, सदस्य तेजस पाटील, देवकिसन रहाडे, करन पाटील, मयूर माळी, अजित पाटील यांच्यासह अनेकजण सहभागी झाले आहेत.
