Share market : निफ्टी निर्देशांक ३४ ने उसळला



मुंबई: जागतिक पातळीवर सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअरबाजारांमध्ये तेजी झाल्याचे पहावयास मिळाले. बीएसई सेन्सेक्स १२२ अंक उसळून ७१४३७.१९ पातळीवर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील ३४ अंक उसळून २१४५३.१० पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या शेअरपैकी नेस्ले, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, आणि एचयूएल कंपन्यांच्या शेअरचे भाव सर्वाधिक वधारले. तर विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, टाटा स्टील, व मारुती सुझुकी कंपन्यांच्या शेअरचे भाव मंगळवारी कोसळले. 

मुंबई. शेअरबाजारात मंगळवारच्या संपूर्ण सत्रात एकूण ३९०४ कंपन्यांच्या शेअरचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. पैकी १८२८ कंपन्यांच्या शेअरचे भाव उसळले, तर १९४० कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले. तथापि १३६ कंपन्यांच्या शेअरचे भाव अचल राहिले. क्षेत्रीय निर्देशांकापैकी पीएसयू, बॅंकेक्स, मेटल, ऑईल ॲण्ड गॅस, पॉवर व हेल्थकेअर या क्षेत्रांच्या निर्देशांकात मंगळवारी तेजीची नोंद झाली. याउलट ऑटो, कॅपिटल गुड्स, रियाल्टी, टेक्नॉलॉजी या क्षेत्रांच्या निर्देशांकात घसरण झाली. जागतिक स्तरावर युरोपमध्ये जर्मनी व फ्रान्सच्या शेअरबाजारात तेजी तर लंडनच्या शेअरबाजारात मंदीची नोंद झाली. 

Post a Comment

Previous Post Next Post