विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्यात मंत्री रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती

 

कल्याण ( शंकर जाधव ) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी कल्याण पश्चिम येथील उंबर्डे परिसरात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गफुर डोन चौक येथील कार्यक्रमासही मंत्री रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

    महापालिकेच्या विविध प्रभागात संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाच्या शिबिरात सुमारे चार हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविली आणि ३८१७ लाभार्थ्यांनी या कार्यक्रमात असलेल्या शिबीरातील विविध शासकिय योजनांचा लाभ घेतला तर गफुर डोन चौकात एकूण ५१० लाभार्थ्यांनी या शिबीरातील विविध योजनांचा लाभ घेतला. विकसित भारत संकल्प यात्रेचा पुढील टप्प्यातील नियोजित कार्यक्रम लवकरच महापालिका क्षेत्रात संपन्न होणार असून या कार्यक्रमासही जास्तीत जास्त नागरिकांनी/लाभार्थ्यांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post