पालिका आयुक्तांचा डोंबिवलीत पाहणी दौरा

 


           विविध कामांचा घेतला आढावा  

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्प, बांधकाम,रस्ते काम, घनकचरा प्रकल्प या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी अचानक दौरा केला. या कामाचा आढावा घेत अचानक दौऱ्यामुळे खरी वस्तुस्थिती समोर असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

    गुरुवारी अचानक पालिका आयुक्त डॉ.जाखड यांनी विविध कामांची पाहणी केली.त्यानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता मनोज सांगळे व इतर अधिकारी वर्गांबरोबर पाहणी कामाबाबत बैठक पार पडली. डोंबिवली पत्रकार कक्षात पत्रकारांशी पाहणी दौरा संदर्भात बोलताना हा दौरा अचानक असल्याने खरी माहिती समोर येत असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, शहरातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन कटिबध आहे.नोंदणीकृत फेरीवाला संदर्भात बैठक घेतली होती.

  मंगळवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकी बाबत आयुक्तांनी रस्त्यांची कामे असून जो अडथळा असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करू. यावेळी सहायक संचालक नगररचनाकार दिशा सावंत, उपायुक्त तावडे, सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, उपअभियंता विसपुते आदी उपस्थित होते.

डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील फिश मार्केट, माणखोली उड्डाणपूल वाहतूक आराखडा, रिंगरूट व डोंबिवली पूर्वेकडील चोळगाव रस्ता, ठाकुर्ली उड्डाणपूल , ,९० फिट गार्डन , डोंबिवली विभागीय कार्यालय या ठिकाणचे पालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांसह अधिकारी वर्गानी पाहणी केली.डोंबिवली पश्चिमेकडील भूसंपादन बाबतही चर्चा करण्यात आली.तर माणखोली उड्डाणपुलाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासनाने पत्र पाठविण्यात आल्याचे पाहणी दौऱ्यात सांगण्यात आले.




Post a Comment

Previous Post Next Post