डोंबिवलीत 'थर्टी फर्स्ट' च्या पार्श्वभूमीवर 'ड्रंक अँड ड्राइव्ह' च्या आठ केसेस

 


 प्रत्येकी दहा हजार रुपये दंड

डोंबिवली ( शंकर जाधव ) : पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करत थर्टी फर्स्ट'ला नवीन वर्षाचे स्वागत फुल्ल तर्राट होऊन वाहने चालविली जातात.अशा तळीरामांवर शहरी पोलीस व वाहतूक पोलिसांची नजर असते.

दोन दिवसात डोंबिवलीत 'थर्टी फर्स्ट' चा पार्श्वभूमीवर 'ड्रंक  अँड ड्राइव्ह' आठ केसेस दाखल झाल्या आहेत.  तीन दिवसांनी सरत्या वर्षाला निरोप देत सन २०२४ चे दमदार स्वागत करण्यासाठी सज्ज होत असलेल्या कल्याण डोंबिवली शहरात तळीरामांना आवर घालत धडक कारवाईसाठी वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत.  शहरात सर्वत्र नाकाबंदी नेमून तळीरामांचा ‘बंदोबस्त’ करण्याची कारवाई सुरू झाली आहे.डोंबिवलीतील विविध चौकात, मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांचे ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी सुरु झाली आहे. नववर्ष स्वागतानिमित्त काही जणांकडून मद्यपान केले जाते. 

डोंबिवलीत दोन दिवसात 'ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह' च्या कारवाई आठ वाहनचालकांवर दंडात्मक करावाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक अजय आफाळे यांनी दिली. यात प्रत्येकी दहा हजार रुपये दंड आकरण्यात आला आहे.३१ डिसेंबरला वाहनचालकांच्या तपासणीसाठी ब्रेथ ॲनलायझरचा वापर करण्यात येणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post