डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली शहर आणि वेगवेगळी आकर्षित प्रदर्शन हे समीकरण राज्यात प्रसिद्ध आहे.विविध धान्य प्रदर्शन, खादी प्रदर्शन, विविध झाडांचे माहिती देणारे प्रदर्शन, विविध आकारातील अगरबत्ती प्रदर्शन, कृषी विषयक प्रदर्शन भरविले गेले.आता चक्क आकर्षक केकचे मोफत प्रदर्शन भरविल्यात आले.
डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकाजवळील जिना केक्सच्या वतीने भरविण्यात आलेल्या केक प्रदर्शनात संताक्लोज , बाहुली, जुनी काळातील फ्रीज म्हणून ओळखला जाणारा पिण्याचे पाण्याची मटका,टाय, डोहाळे जेवण हे व असे प्रकारचे केक प्रदर्शनात ठेवले होते.विशेष म्हणजे यातील डोहाळे जेवण या केकला सर्वात जास्त मागणी असल्याचे रेशमा वाजगे यांनी सांगितले.हे प्रदर्शन पाहण्यासाठी बच्चेकंपनीने गर्दी केली होती.या प्रदर्शनाची शहरात चर्चा होत आहे.