डोंबिवली ( शंकर जाधव ) : शेठ श्री के बी वीरा हायस्कूल डोंबिवली पूर्व गुजराती माध्यम शाळा येथे विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक सप्ताहात विद्यार्थ्यांकडून शेती ,विद्युत,पाणी, पर्यावरणावर आधारित विज्ञान प्रदर्शन,भाषांचे भिंतीपत्रके व वाहतूक नियमांचे चित्र प्रदर्शन होते. आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मणीलाल शिंपी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी वाहतूक विभाग पोलीस हवालदार संजय बडगुजर, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष विशाल शेट्टी, रोटरी क्लब मिड टाऊन डोंबिवलीचे डॉ.किशोर अढळकर , आरएसपी अधिकारी करण जडेजा, संस्थेचे पदाधिकारी माणिकभाई देढीया, शाळेचे मुख्याध्यापक प्रज्ञेश नायक व शिक्षक उपस्थित होते. या हे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व पालकवर्ग आले होते.