रायगडाच्या मेघडबंरीतील हुबेहूब शिवमूर्तीचे अनावरण
डोंबिवली \ शंकर जाधव : अनेक वर्षांपूर्वी डोंबिवली शहरातील मानपाडा रोड शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. छत्रपती शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीसह सिंहासनारूढ प्रतिमा शिवस्मारकात विराजमान करण्यात आली आहे.रायगडाच्या मेघडबंरीतील हुबेहूब शिवमूर्तीचे अनावरण पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत शिवगर्जना, ढोल-ताशा, लेझीम, घोडेनृत्याच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.मानपाडा रोडवरील शिवसेना शाखेसमोरील पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले.हुबेहूब रायगडाच्या मेघडबंरीतील राजबिंडे शिवरायांचे दर्शन घेण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार आला. या लोकार्पणासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण, पालिका आयुक्त अभिनव गोयल, शिवसेना आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश म्हात्रे, माजी आमदार आप्पा शिंदे,सुरेश जोशी, भाजप अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख लता पाटील, कल्याण जिल्हा लोकसभा अध्यक्ष जितेन पाटील, तालुकाप्रमुख महेश पाटील, गुलाब वझे,युवा सेना जिल्हा सचिव राहुल म्हात्रे, सागर जेधे,संतोष चव्हाण, माजी नगरसेवक संजय पावशे,दत्ता वझे, जयंता पाटील, शीतल लोके, कविता गांवड, शिल्पा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.