भात खाल्ला तर वजन वाढतं, असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. आणि ते बऱ्याच अंशी बरोबरदेखील आहे आणि मग त्यामुळे काहीजण भात खाणे टाळतात. पण वास्तविक भातासाठी आपण जे तांदूळ घेतो ते आणि ते ज्या पद्धतीने शिजवतो, ती पद्धत... या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत या दोन्ही गोष्टीत थोडा बदल केला तर नक्कीच भात खाल्ल्याने वजन वाढणार नाही.
हल्ली बहुतांश लोक पांढरा स्वच्छ दिसणारा तांदूळ खरेदी करतात. हा तांदूळ पॉलिश केलेला असल्याने दिसायला एकदम चकाचक असतो. त्यामुळे मग तोच उच्च दर्जाचा असं समजून आपण तो घेतो. पण असा पॉलिश तांदूळ खाणं हे वजन वाढीचं एक कारण असू शकतं. दक्षिण भारतात बहुतांश लोक पॉलिश न केलेला तांदूळ खातात. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर लोक तुम्हाला भात न खाण्याचा सल्ला देतील. याच कारणामुळे भात कितीही आवडत असेल तरीही लोक भात खाणं टाळतात. भारतात दक्षिणेला सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो.
साऊथ इंडियाचे फेमस पदार्थ जसं की इडली, डोसा, अप्पम, खीर, अप्पे या सगळ्यात पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक आहे. तिथल्या जास्तीत जास्त पदार्थांत तांदूळ असतो. पण इतका भात खाऊनही त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. एक्सपर्ट्सच्या मते भात खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच तुम्ही किती भात खाताय हे सुद्धा महत्वाचे असते. भात असो किंवा खिचडी असो आपण ती कुकरमध्येच लावतो. हे देखील भात खाऊन वजन वाढण्याचं एक मुख्य कारण आहे.
दक्षिण भारतीय लोक जेव्हा भात करतात, तेव्हा ते तांदूळ पातेल्यामध्ये शिजवतात. सगळ्यात आधी ते तांदुळ स्वच्छ धुतात. त्यानंतर तो पाणी टाकून पातेल्यात शिजायला ठेवतात. काही मिनिटांनी तांदुळावर फेस जमा होतो. हा फेस ते काढून टाकतात आणि त्यानंतर पुन्हा गरजेनुसार पाणी टाकून भात शिजवतात. अशा पद्धतीने तांदूळ शिजवला आणि पॉलिश न केलेला तांदूळ वापरला तर नक्कीच भात खाल्ल्यामुळे वजन वाढणार नाही. काही दिवस हा उपाय करून पाहायला हरकत नाही.
भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली होती असं नाही. पूर्वी अंग मेहनत खूप व्हायची, आता ती होताना दिसत नाही म्हणून पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही व्यायाम करणार नाही आणि फक्त भात बंद कराल, यामुळे पोटं सपाटीला जातील असं अजिबात होणार नाही. भात योग्य पद्धतीने शिजवल्यास भात खाण्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि पोटही सुटणार नाही. यासाठी नियमित व्यायामाची सवय ठेवा.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)