डॉ. काशिनाथ सभागृहात रविवारी रंगणार मैफल
मुंबई : भारतीय संगीतक्षेत्रातील एक अवलिया गायक ज्यांच्या सुमधुर आवाजाने सर्व भारतीयांना मोहित करुन त्यांच्या मनावर अविरत राज्य केले आणि त्यांच्या या दिलखेचक मनाला भुरळ पाडणाऱ्या आवाजाचे अगदी अबाल वृद्धांपासून तरुण पिढीपर्यंत आजही अनेक चाहते आहेत. अशाच या आपल्या आवाजाच्या बादशहा म्हणजेच स्वर्गीय मोहम्मद रफीं साहेबांचा दिनांक २४.१२.२०२३ रोजी ९९ वा वाढदिवस आहे. या ९९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्हीजन म्युझिक चे सर्वेसर्वा महेंद्र देठे यांनी रफी साहेबांच्या चाहत्यांसाठी त्यांच्या देशभक्ती, विरहगीत, प्रेमगीत अश्या विविध सदाबहार गाण्याचा कार्यक्रम दिनांक २४.१२.२०२३ रोजी सायंकाळी ३.३० वाजता ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित केलेला आहे.
व्हिजन म्युझिक इंडिया या संस्थेचे श्री महेंद्र देठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. व्हिजन म्युझिक इंडिया ही एक नोंदणीकृत संस्था असून, यामध्ये अनेक गायक घडविण्याचे काम गेल्या १५ वर्षापासून केले जाते. महेंद्र देठे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू केरकर हे १३ वाद्यवृंद वादकांना सोबत घेऊन हा गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. या कार्यक्रमात व्हिजन म्यूजिकच्या सुरेल गायकांची टीम रफींच्या गाण्यांना आपला स्वरसाज देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. यात नटराज अय्यर, रामके अय्यर, शलाका कोळी, अंजली मानकर, साधना जयराम, भैरवी सावंत, सुजाता तटकरे, राजेश भिडभिडिया, प्राची दिघे, रोहिणी जोशी, सचिन वाघ, हर्षद कुर्लावाला, विवेक पुराणिक, सायली परब, प्रभा कृष्णन, वैशाली जगताप, प्रशांत जगताप, पूजा जावळे, समीर सावंत, उषा पवार, नंदिनी सुर्वे, ज्योती रोकडे यांचा समावेश आहे तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरती शेट्टी करणार आहेत.
Tags
मनोरंजन
