मनसेच्या दणक्यानंतर गुजराती कंपनीकडून मराठी माणसाच्या पैशाची परतफेड

 

दिवा,(आरती मुळीक परब) :  गेल्या तीन महिन्यांपासून मराठी व्यावसायिक सिध्देश पडवळ यांच्या टेम्पोंचे एक लाख तीस हजाराचे पेमेंट श्री नंदन कुरिअरच्या मालकाने रखडवले होते. पण त्याला मनसेचा दणका देताच त्या गुजराती कंपनीने तात्काळ मराठी माणसाचे पूर्ण पैसे दिले.

दिव्यातील साबे गावातील मनसे शाखा अध्यक्ष सयाजी चव्हाण (सरकार) यांना सिध्देश पडवळ या टेम्पों मालकाचे तीन महिन्यांचे पेमेंट श्री नंदन कुरिअरच्या मालकाने रखडवल्याचे कळताच त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसह श्री नंदन कुरिअरच्या महापे हबला भेट देऊन हब ऑफिस आत बसून बाहेरून टाळे मारले. जोपर्यंत टेम्पोंचे पूर्ण पेमेंट सिध्देश पडवळ याच्या अकाउंटला येणार नाही तोपर्यंत एकही कुरिअरचे पार्सल बाहेर जाणार नाही, असा इशारा सयाजी चव्हाणने हबमधील मॅनेजरला दिला. अवघ्या दोन तासात एक लाख तीस हजाराचे पेमेंट सिध्देश पडवळच्या अकाउंटमध्ये जमा झाले. त्यानंतर मनसे शाखाध्यक्ष सयाजी चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते हबच्या बाहेर आले.

यानंतर चव्हाण यांनी असा कंपनीला इशारा दिला की मुंबईमध्ये जेवढे कंपनीचे हब आहेत. त्यामध्ये काम करणारे स्टाफ ५० % मराठी पाहिजे. त्या मराठी टेम्पो व्यवसायिक सिध्देश पडवळ याला पूर्ण पेमेंट मिळाल्यामुळे त्याने मनसे कार्यकर्त्यांचे व शाखाध्यक्ष सयाजी चव्हाण यांचे आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post