मुंब्रादेवी कॉलनी मच्छी मार्केटमधील अर्धवट रस्त्यामुळे स्थानिक हैराण
दिवा, (आरती मुळीक परब) : दिवा पूर्व येथील मुंब्रादेवी कॉलनीतील मच्छी मार्केट रोड अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पावसाशिवाय या रस्त्यावर रोज पाणी साचत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून मुंब्रादेवी कॉलनी मच्छी मार्केटमधील अर्धवट राहिलेला रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ठाणे महापालिकेने गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट ठेवलेल्या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. मुंब्रा देवी कॉलनी ट्रान्सफॉर्मर ते दिवा आगासनला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था त्यामुळे बिकट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या रस्त्याच्या बांधकामाला पावसाळ्यापूर्वीच सुरुवात झाली होती. मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्या भागातूनच पाण्याच्या अनेक लाईन गेल्या आहेत. तेथील रस्त्याचे काम करताना त्या तुटल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचून राहते. संपूर्ण रस्त्यावर पाणी साचल्याने तेथे दलदल तयार झाले आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरात कोटसुदेश सकपाळ, नागरिक, मुंब्रा देवी कॉलनीचा समावेश आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता आजपर्यंत अर्धवटच राहिला आहे. त्यामुळेच या अर्धवट रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
- जिलाजित तिवारी, स्थानिक समाजसेवक
नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर रस्ता तयार करावा. जेणेकरून महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थ्यांसह, रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये. मुख्य रस्ते धुळीने भरलेले आहेत. दिवा परिसरातील अंतर्गत रस्ते त्यांचीच कहाणी सांगत आहेत.
- विनय पांडे, स्थानिक रहिवासी

