कोपरगाव/ प्रतिनिधी : बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी नुकतीच दिलीप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोपरगाव येथील हॉटेल विरा पॅलेसमध्ये नुकतीच बहुजन शक्ती या सामाजिक संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत अ. नगर जिल्ह्यातील तसेच कोपरगाव तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष परेश मोटे यांच्या हस्ते दिलीप गायकवाड यांना नियुक्त पत्र देण्यात आले. तसेच अ. नगर जिल्हा उपाध्यक्षपदी योगेश देवकर आणि कोपरगाव तालुका अध्यक्षपदी बद्रीनाथ बोराडे यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली. येणाऱ्या काळात संस्थेमार्फत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे व समाजातील सर्व घटांपर्यंत संस्थेचे कार्य पोहचवणे ही कामगिरी करावी लागणार आहे. यावेळी बहुजन शक्ती संस्थेचे सचिव तुळशीराम मगरे, बाबासाहेब साबळे, रवि मोरे, शुभम वारे, सुशील शरणागत आदी उपस्थित होते.
दिलीप गायकवाड हे सामाजिक कार्यकर्ते असून बहुजन समाजातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या निवडीबद्दल कोपरगाव तालुक्यातील जे कुंभारी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब वक्ते पाटील,खादी ग्रामोद्योगचे संचालक दादासाहेब चव्हाण पाटिल, मा. सैनिक मारुतीराव कोपरे पाटील, पोलीस मित्र विजयराव हलवाई , रघुनाथ गुरसळ पाटील, मेघराज शिंदे पाटील, गोविंदराव शिंदे पाटील, यादवराव शिंदे पाटील, विजय कटाळे पाटील आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे ॲड.रावसाहेब मोहन, ॲड. गणेश मोकळ, ॲड. सुजित केदारे, ज्येष्ठ पत्रकार भारत देवगावकर आदी उपस्थित होते.