मुंबई/ प्रतिनिधी : संपूर्ण मुंबईत वाल्मिकी समाज असून जेथे जेथे हा समाज आहे तिथे तिथे त्यांचे शिवसेनेशी घट्ट नातं असून हा समाज शिवसेनेवर एवढं प्रेम करतो या वाल्मिकी समाजाच्या पाठीमागे शिवसेना मजबुतीने उभी असल्याच प्रतिपादन शिवसेना नेते मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि वाल्मिकी भिम संघाच्या वतीने वाल्मिकी समाजाचा निर्धार मेळावा शनिवारी वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री डॉ. ॲड. अनिल परब यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.आपल्या सत्काराला उत्तर देताना परब बोलत होते.
यावेळी विभाग संघटक सदा परब,उपविभाग प्रमुख शशिकांत एळमकर , नगरसेवक अनिल त्रिमबकसर,रजनी मिस्त्री, भक्ती भोसले, कामगार सेनेचे चिटणीस ॲड हरी शास्त्री, वाल्मिकी भिम संघाचे अध्यक्ष- शिवसैनिक जितेन्द्र कागडा,राजेश बोत, बॉबी आदिवाल,सुनिल तुसंबड, सुरेंद्र लोहाट तसेच शिवसैनिक आणि वाल्मिकी समजा मोठ्या प्रमाणत उपस्थित होता.
मुंबई स्वच्छ ठेवण्यात वाल्मिकी समाजातील अनेक लोक धडपडत असतात. या समाजाच्या उद्धारासाठी शासकीय स्तरावर वेगवेगळी कार्यक्रम आणि योजना राबविणे जाणे गरजेचे आहे.त्याना न्याय आणि हक्क वेळोवेळी मिळाला पाहिजे,असे ही परब म्हणाले.