युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांचे आश्वासन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा' असा ध्यास समोर ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार व रविवारी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले जात आहे.रविवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील सह्याद्री कार्यालयात युवा सेना साचूव तथा माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महाआरोग्य शिबीर भरविले होते.यावेळीम्हात्रे यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा लवकरच कायापालट होणार असून डोंबिवलीतही कॅशलेस हॉस्पिटल सुरू करू असे आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.शिबीरात ईसीजी तपासणी, मधूमेह तपासणी,जनरल तपासणी व इन्जोग्राफी , किडनी स्टोन ऑपरेशन, गुडघा प्रत्यारोपण, मोतीबिंदू ऑपरेशन, बायपास असे ठेवण्यात आले होते.यावेळी युवा सेनेचे सचिव म्हात्रे म्हणाले, सुतिकागृहाचे काम सुरू असून लवकरच भूमिपूजन होणार आहे.तसेच शास्त्रीनगर रुग्णालयाचा कायापालट होताना पाहाल असेही म्हात्रे म्हणाले.
