डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिक्षण क्षेत्रात नामांकित आणि आता जगभरात विद्यार्थी असलेल्या खर्डीकर क्लासेसचे संस्थापक तसेच प्रसिद्ध व्यावसायिक डॉ. सुनील खर्डीकर यांना नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या राष्ट्रीय विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पदक देऊन गौरविण्यात करण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांना यावेळी सन्मान पदके देऊन गौरविण्यात आले.
नवी दिल्ली येथे बाबू जगजीवन राम जी यांच्या ५२ व्या राष्ट्रीय विजय दिनानिमित्त मुंबईच्या डोंबिवलीमधील नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉ. सुनील गणपत खर्डीकर यांना माजी संसद अध्यक्ष मीरा कुमार यांच्या हस्ते महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान स्वीकारत असताना मीरा कुमार यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
डॉ. सुनील खर्डीकर हे खर्डीकर क्लासेसचे संस्थापक असून त्यांनी आतापर्यंत जवळपास १८ हजारहुन अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवले आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जेमतेम विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेला खर्डीकर क्लासेस हा आता केवळ महाराष्ट्र राज्याकरिता मर्यादित राहिलेला नसून तो आता महाराष्ट्र बाहेरील राज्यांमध्ये तसेच परदेशात दुबईपर्यंत पोहोचला आहे. परदेशात असलेले विद्यार्थी देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे खर्डीकर क्लासेसमध्ये शिक्षण घेत असून यश संपादन करीत आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून डॉ. सुनील खर्डीकर यांना राजेंद्र भवन ट्रस्ट व जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीने सन्मान पदक देऊन सन्मानित केले आहे. याबद्दल डॉ.सुनील खर्डीकर यांनी संयोजकांचे आभार मानले. डॉ. सुनील खर्डीकर यांच्या पत्नी संगीता खर्डीकर यांनाही सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, त्यामुळे अडलेल्यांची मदत करणे म्हणजे समाजाप्रति आपली जबाबदारी आपण पार पाडतो अशा भावना यावेळी संगीता खर्डीकर यांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे शिर्डी जिल्ह्यामधील बाळासाहेब थोरात यांचे संपर्क प्रमुख मामा पगारे यांना बाबू जगजीवन दास राष्ट्रीय सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले. पालघर जिल्ह्यामधील शिक्षणतज्ञ जनार्दन जव्हारकर यांना बाबू जगजीवन दास राष्ट्रीय सन्मान पदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व समाजसेवक दिलीप धनगाव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सांगली जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संस्थापक संपादक युवराज सुरले यांना महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय सन्मान पदक तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या मुख्य संपादिका अमृता पाटणकर सावित्रीबाई महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पदक देऊन गौरविण्यात आले.

