अहिराणी दिनदर्शिका-२ चा प्रकाशन सोहळा संपन्न
डोंबिवली ( शंकर जाधव ) : साठे विभोचन समारंभ , डोंबिवली कोकन परांत कमिटीच्या वतीने खान्देसनी अस्मिता, अहिरानी दिनदर्शिका-२ चे प्रकाशन सोहळा डोंबिवली पश्चिमेकडील रेती भवन सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.विकास पाटील, कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर,कोकण प्रांतचे अहिराणी प्रचारक अध्यक्ष प्रा. मगन सूर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते. ही दिनदर्शिका दोन कोटी जनतेपर्यत पोहचविण्याचा उद्देश असून या दिनदर्शिकेचे पहिला प्रत्येक कॉलम मराठी भाषेतून लिहिला आहे. मराठी भाषिकांना अहिराणी भाषा शिकता येईल.
दिनदर्शिकेच्या मागील पानावर माहित दिली आहे. आहे. मराठी भाषिकांनी ही दिनदर्शिका नक्कीच वाचावी. भाषा वाचली पाहिजे, भाषा पुढील पिढीला कळली पाहिजे. बरेच लोक स्तल्तींत झाले आहेत. यातच चालचल उभी राहिली पाहिजे. अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करायचा आहे असे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कोकण प्रांतचे अहिराणी प्रचारक अध्यक्ष प्रा. सूर्यवंशी यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी या दिनदर्शिकेचे कौतुक केले.