बॉलीवूड स्टार काजल अग्रवालच्या हस्ते शुभारंभ
ठाणे : आरामदायक आणि दर्जेदार पोशाखांच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या बॉडीकेअर इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या विस्तार धोरणा अंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे येथे २६ वे खास ब्रँड आउटलेटच्या सुरू करत असल्याची घोषणा केली. कंपनीची ब्रँड अॅम्बेसिडर प्रसिध्द अभिनेत्री काजल अग्रवालच्या हस्ते या आउटलेटचे उद्घाटन झाले. हे आउटलेट ६४८ चौरस फुटांचे आहे. या कार्यक्रमाला कंपनीचे संचालक, पुरवठादार, वितरक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बॉडीकेअर इंटरनॅशनलचे संचालक मिथुन गुप्ता म्हणाले, "आमच्या रिटेल क्षेत्रातील प्रवासातील एक मैलाचा दगड असलेल्या ठाण्यात आमच्या २६व्या खास ब्रँड आउटलेटचे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे. या आउटलेटमध्ये आमची विस्तृत उत्पादन श्रेणी उपलब्ध असेल, ज्यामध्ये इनरवेअर, थर्मल वेअर आणि मुलांचे पोशाख यांचा समावेश आहे. आमच्या मौल्यवान ग्राहकांना खरेदीचा सर्वसमावेशक अनुभव प्रदान करणे आणि नवीन क्षेत्रांमध्ये मजबूत पाय रोवून विस्तार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण भारतातील मातांना प्रिय असलेला ब्रँड म्हणून, आमचे आरामदायक आणि त्वचेसाठी अनुकूल कपडे त्यांच्या आवाक्यात आणणे , हे आमचे ध्येय आहे .
अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाल्या, “बॉडीकेअर इंटरनॅशनलसोबत भागीदारी करणे माझ्यासाठी खूप आनंदाचे आहे. मी एक आई आहे, माझ्या लहान मुलाला उत्तम आणि आरामदायी कपडे देणे, त्याच्या आरोग्यासाठी ते योग्य असतील याची खात्री करणे याला माझे प्राधान्य आहे. म्हणूनच, बॉडीकेअर इंटरनॅशनलचे मुलांसाठी दर्जेदार आणि त्वचेसाठी अनुकूल उत्पादनांवर विशेष लक्ष केंद्रित करणे माझ्या मूल्यांशी सुसंगत आहे. नवजात मुलांच्या नाजूक त्वचेसाठी खास उत्पादने देण्याचे महत्त्व त्यांना समजते. हे सहकार्य मला अन्य मातांशी संपर्क साधण्यास सक्षम करते. आपल्या मुलांचे कल्याण आणि आनंद याला नेहमीच सर्व मातांचे प्राधान्य असते.”
पोशाख उद्योगातील सर्वोच्च योगदानकर्त्यांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. त्यामुळे देशी उत्पादक आणि वितरकांना या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. यात बॉडीकेअर इंटरनॅशनल सारखे प्रेरणादायी आणि ग्राहक-केंद्रित ब्रँड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ४५० हून अधिक वितरक, १८ हजारांहून अधिक किरकोळ विक्रेते, २६ विशेष ब्रँड आउटलेट आणि मजबूत ऑनलाइन उपस्थितीच्या माध्यमातून बॉडीकेअर इंटरनॅशनल आपली उत्पादने देशभरात सहज उपलब्ध करून देते. त्याचे आकर्षक फ्रँचायझी मॉडेल उदयोन्मुख उद्योजकांना ब्रँडच्या यशात सामील होण्यासाठी आकर्षित करते. नवीन आऊटलेट उघडण्याच्या मोहिमेतून कपंनीने वितरण जाळे विस्तारासाठी गुंतवणूक आणि उत्पादन क्षमता वाढविण्याच्या धोरणानुसार पुढे वाटचाल सुरू केली आहे.
बॉडीकेअर इंटरनॅशनल हे सर्व मातांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन आहे ज्यांना स्वतःच्या मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अनुकूल आणि आरामदायक पोशाख खरेदी करायचे आहेत. पोशाख आणि इनरवेअरची सर्वांत मोठी श्रेणी ऑफर करण्याव्यतिरिक्त, बॉडीकेअर इंटरनॅशनल देशभरातील मातांशी खास नाते दृढ करत आहे.