डोंबिवली ( शंकर जाधव ) : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर मध्ये आंतरशालेय चित्रकला स्पर्धा संपन्न झाली .स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पाध्यक्ष विद्याधर शास्त्री यांनी श्रीफळ वाढवून तसेच गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षावात स्पर्धेच्या फलकाचे अनावरण केले. आंतरशालेय चित्रकला स्पर्धेची संपूर्ण धुरा सांभाळणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सदस्या ऍडव्होकेट ललिता जोशी , शीला गवळी , स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक विभागाच्या सन्मा मुख्याध्यापिका मुणगेकर उपस्थित होत्या. या स्पर्धेत ४६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे उद्दिष्ट एडवोकेट ललिता जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मांडले. या स्पर्धेचे प्रायोजक अनंत नगरकर व अनुपमा नगरकर यांचे आभार मानले. स्पर्धेत नर्सरी ते दहावी पर्यंतच्या ४६० विद्यार्थ्यांनी सुरेख चित्र रेखाटली. या स्पर्धेच्या प्रमुख पाहुणे म्हणून वास्तु शिल्पकला विशारद धनश्री भोसले उपस्थित होत्या. प्रत्येक गटासाठी कलाशिक्षक परीक्षकांची निवड केलेली होती .प्रत्येक गटामधून प्रथम , द्वितीय ,तृतीय ,उत्तेजनार्थ प्रथम ,द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले.शाळेच्या निवृत्त शिक्षिका डोके यांच्याकडून कायम ठेव बक्षिस योजनेअंतर्गत प्रथम ,द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले . परीक्षक म्हणून संतोष साबळे , पंढरीनाथ बोंद्रे , किशोर वेदे , हेमा उगले, देवीदास गवारी, अश्विनी सालियन यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या वेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय कलेतील थोर चित्रकारांच्या परंपरेविषयी व कलेविषयक मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भोसले यांनी विद्यार्थ्यांना या कला क्षेत्रात पुढे भरीव कार्य करण्या संबंधित मार्गदर्शन केले .गटनिहाय विजेत्या स्पर्धकांचे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले .संपूर्ण सोहळा अतिशय दिमाखात पार पडला . चित्रकला स्पर्धेच्या कार्यक्रमाचे निवेदन नलावडे व इथापे यांनी केले. कुमार राजस आठवले या विद्यार्थ्याच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गट क्रमांक एक
प्रथम क्रमांक - दीक्षा गोपी तुळसकर. (बाहुली)
द्वितीय क्रमां
क- श्लोक नितीन तळेकर (छत्री)
तृतीय क्रमांक - आकांक्षा एकनाथ बोराडे (बाहुली)
गट क्रमांक दोन
प्रथम क्रमांक-अद्विक प्रसाद थोरवे( मासा)
द्वितीय क्रमांक- स्वरा शिवाजी पाटील (मासा)
तृतीय क्रमांक- हृदयी सुदीप मयेकर( जोकर)
गट क्रमांक तीन
प्रथम क्रमांक - सानवी सुनील पाटील (आकाश कंदील)
द्वितीय क्रमांक- स्वरूप विद्याधर जाधव (आकाश कंदील) तृतीय क्रमांक - नेहल सचिन पाटील( आकाश कंदील)
गट क्रमांक चार
प्रथम क्रमांक - आदिती भगवान देवकुळे (वृक्षारोपण)
द्वितीय क्रमांक -केतकी प्रशांत बाबर( पिशवीवरील नक्षीकाम)
तृतीय क्रमांक - दिव्या अशोक कदम( वृक्षारोपण)
गट क्रमांक पाच
प्रथम क्रमांक - आयुषी संजय बांदकर (आवडता सण)
द्वितीय क्रमांक - प्रतिज्ञा रमेश राडये( गालीच्या वरील नक्षीकाम)
तृतीया क्रमांक - पूर्वा विकास साळस्कर (आवडता सण)
गट क्रमांक सहा
प्रथम क्रमांक - हर्षाली दीपक गुजर
द्वितीय क्रमांक - मृणाली युवराज पाटील
तृतीय क्रमांक - उत्तम अभिमन्यू पाथरे (चांद्रयान थ्री मोहीम)


