इंडियन नेव्ही डे दिवशी श्रावणीची एलिफंटा ते गेटवे १२ किमी.पोहून सलामी

डोंबिवली : सोमवार ४ डिसेंबर रोजी अंगाला ग्रीस लावून एलिफंटा येथे पहाटे ४ वाजून ३२ मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक  सुनील मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्यास सुरुवात केली.श्रावणीने जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सकाळी गेटवे ला सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पोहचली. 

समुद्रातून बाहेर आल्यावर तिने भारतमातेच्या रक्षणासाठी समुद्रामध्ये गस्त घालणाऱ्या नौदलातील जवानांच्या शौर्याला 'इंडियन नेव्ही डे' दिनी श्रावणी ने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया १२ किमी.सागरी जलतरण अंतर पोहून पार करून सलामी दिली. एवढ्या लहान वयात समुद्रातील इव्हेंट केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post