डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बालनगरीत बच्चेकंपनीची धम्माल
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रात पोळीभाजी केंद्र सुरु करणाऱ्या डोंबिवलीत गेल्या १३ वर्षापासून भव्य कोकण महोत्सव म्हणजे खवय्ये डोंबिवलीकरांसाठी मेजवानीच ठरली. कोळी – आगरी समाजातील खाद्यसंस्कृती दर्शन, कोकणातील सुका मेवा, दशावतार नाट्य, मॅजीक शो, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली लावणी, स्थानिक कलाकारांची नुत्यविष्कार, लोककला भारुड यांसह भव्य बालनगरी याची रेलचेल असलेल्या या महोत्सवात दिसते. २४ नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा महोत्सव १० डिसेंबरपर्यत सुरु राहणार आहेत.
कोकण एकता प्रतिष्ठानच्या वतीने भाई पानवडीकर यांनी आयोजित केलेला भव्य कोकण महोत्सव डोंबिवली पपश्चिमेकडील रेल्वे मैदान येथे सुरु आहे. महोत्सवात महिला बचत गटाचे स्टोलकडे महिलावर्गणी गर्दी केल्याचे दिसते.अनेक डोंबिवलीकर या महोत्सवाला भेट देत असून यातून रोजगाराची संधीही मिळत अअसल्याचे आयोजक पानवडीकर यांनी सांगितले.स्थानी कलाकारांना आपली कला सादर करता यावी याकरता महोत्सवात व्यासपीठ मिळवून दिले जाते. कोकणाचीओळख असलेले दशावतार नाट्य आणि डबलवारी सामना पाहण्यासाठी शहातील चाकरमानी आवर्जून येते असतात.महिलांसाठी `होम मिनिस्टर` स्पर्धा असल्याने महिला वर्गाची उपस्थित दिसते. बच्चेकंपनी विशेष करून भव्य बालनगरी बनवली आहे.या महोत्सवाला पेस मेकर्स अकादमीचे सर्वेसर्वा तथा नृत्य दिग्दर्शक योगेश पाटकर, डॉ. अमित दुखंडे, समाजसेवक प्रवीण साळवी, रविंद्र गुरचळ, मनसे पदाधिकारी प्रेम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटक संजय पाटील, उद्योजिका अर्चना पाटील, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपशहर प्रमुख कैलास सणस यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.