आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघाचा पहिल्या वर्धापनदिन
दिवा, (आरती मुळीक परब) : आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघाच्या पहिल्या वर्धापनदिनी सकाळच्या सत्रात महारक्तदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बहुसंख्य रक्तदात्यांनी स्वतः पुढे येऊन रक्तदान केले. त्यावेळी रक्तदात्यांना संघटनेच्या मार्फत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी संगीत महा गायन, तबला, पखवाज जुगलबंदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम, गायक जगदीश चव्हाण, मुरबाडचा बुलंद आवाज, गायक कैलास कडव,जगविख्यात पखवाज वादक कृष्णाची साळुंखे, नवोदित युवा तबला वादक, कु. सोहम गोराने यांनी सादरीकरण केले. तर या कार्यक्रमात निवेदक म्हणून सिंधुदुर्गचा बुलंद आवाज राजाजी सामंत यांनी धुरा सांभाळली होती. दिवा शहरात प्रथमच संगीत महा जुगलबंदी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती.
या कार्यक्रमास बहुसंख्य दिग्गज मंडळी आणि भजनी कलावंत, दशावतारी कलावंत यांनी हजेरी लावली होती . तसेच कार्यक्रमास ठाणे, डोंबिवली, कल्याण तसेच मुंबई शहरातून देखील मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांनी उपस्थिती दाखवली होती. तसेच दिवा शहरातील ही मान्यवर नेते मंडळींनी सुद्धा कार्यक्रमास हजेरी लावली होती.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष बंसिधर सावंत, उपाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष उमेश घोगळे, सचिव रामकृष्ण सावंत, उपसचिव महेश पारकर, खजिनदार समिर सावंत, उप खजिनदार महेश सावंत, सदस्य सचिन घाडीगांवकर, सदस्य कमलेश सुतार, सल्लागार विजय सावंत, कांचन मांजरेकर, प्रशांत कदम, किरण लाड, गितेश परब, विनोद शिंदे, आनंद सावंत, प्रथमेश घाडीगांवकर आणि वैभव जाधव मोलाचे सहकार्य दिले.


