Donal trump डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अपात्र

कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

कोलोरॅडो:  ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या कॅपिटल हिंसाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( donald trump) यांना २०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी ( American president election) अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक आता लढवता येणार नाही. इतकंच नाही तर कोर्टाने राज्याच्या सचिवांना ट्रम्प यांचे नाव रिपब्लिक (republic) राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतून वगळावे असेही आदेश दिले आहेत.

अमेरिकेत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात डोनाल्ड ट्रम्प हे पहिले असे नेते आहेत ज्यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशाप्रकारे अयोग्य ठरवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार विद्रोहात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत केले जाऊ शकते किंवा नेत्यांवर निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यानुसार आता कोर्टाने हा निर्णय दिला आहे जो डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा झटका मानला जातो आहे. हा निकाल कोलोराडो न्यायालयाने दिला असला तरीही तो एका राज्यापुरता मर्यादित आहे. 

६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारून पराभव झाला होता. डेमोक्रॅटिक ( democratic) पक्षाच्या जो बायडन ( joe biden)  यांनी ट्रम्प यांना तब्बल ७० लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवले होते. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असे म्हणत ट्रम्प यांनी आपला पराभव नाकारला. परिणामी ट्रम्प समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटल भवनाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला. तर याशिवाय अनेकजण जखमी झाले.

दरम्यान,आंदोलकांना चिथावणी देण्याचा ठपका ठेवत ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात दोन तृतीयांश मते न पडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता कोलोरॅडो हायकोर्टाने याप्रकरणात त्यांना दोषी मानत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.

याविरोधात त्यांनी अमेरिकेतल्या न्यायालयात धाव घेतली. पण, न्यायालयाने त्यांना फटकारले आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचे सांगितले. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. आणि ट्विटरवरून सतत आपली मतं मांडत राहिले.

Post a Comment

Previous Post Next Post