उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध

 


दिवा, (आरती मुळीक परब) :  सुप्रीम कोर्टाकडून दिलेल्या नियमाप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाचा निर्णय देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी पक्षपात करून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना ही एकनाथ शिंदेची असा चुकीचा निर्णय दिल्याने दिव्यातील शिवसैनिकांनी घटनाबाह्य सरकारचा व राहुल नार्वेकर यांचा निषेध केला.

 यावेळी लोकसभा महिला संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटिका कविता गावंड, कल्याण ग्रामीण संघटिका दिवा शहर योगिता नाईक, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील, उप शहर प्रमुख वैष्णव पाटील, विभाग प्रमुख मच्छिंद्र लाड, नागेश पवार, संजय जाधव, अजित माने, अनिकेत सावंत, संजय निकम आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post