डोंबिवलीत शिवसैनिकांचा ढोल - ताश्याच्या गजरात जल्लोष

 


 नागरिकांना वाटले पेढे

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले. या निर्णयाचे स्वागत करत राज्यभर शिवसैनिक आनंद व्यक्त करत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र ठरले. डोंबिवलीतील शिवसेना शाखेसमोर ढोल ताश्याच्या गजरात शिवसैनिकांनी जल्लोष केला.शिवसैनिकांनी नागरिकांनी पेढे भरत आनंद व्यक्त केला. 

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अपूर्ण केला. यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,अभिजित दरेकर, शिवसेना डोंबिवली शहर समनव्यक जितेन पाटील, डोंबिवली विधानसभा सचिव संतोष चव्हाण,डोंबिवली विधानसभा शहर अधिकारी सागर दुबे, विभागप्रमुख अमोल पाटील, समीर कवडे, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, कार्यालयप्रमुख प्रकाश माने, सहकार्यालय प्रमुख सागर बापट,माजी विभाग प्रमुख सुनील मालणकर, सागर बापट, संतोष तळशिलकर, दिनेश शिवलकर यासह शिवसैनिक व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

  यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, या निर्णयाने शिवसैनिकच नव्हे तर जनताही आनंदी झाली. हरलेल्या व्यक्तींना नेहमी समोरच चुकीचा दिसतो असा टोलाही कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांचा उद्धव ठाकरे यांना लगावला.शहर प्रमुख राजेश मोरे यांनी हा सत्तेचा निर्णय झाल्याचे सांगितले.





Post a Comment

Previous Post Next Post