उपवन येथील म्युझिकल फाऊंटनचे १२ जानेवारीला लोकार्पण

 


आमदार प्रताप सरनाईक व आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

ठाणे, : येऊरच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य उपवन परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून बनारस घाटाच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या उपवन घाटाचे (upvan ghat)  लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सायं. ८ वाजता होणार आहे.  त्याआधी आ. प्रताप सरनाईक आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपवन घाटाची पाहणी केली.

उपवन तलावामध्ये होत असलेले म्युझिकल फाऊंटन हे ठाणे जिल्ह्यातील पहिले म्युझिकल फाऊंटन असून या म्युझिकल फाऊंटनच्या दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनावर आधारित चलचित्र द्वारे पाच मिनिटाचा देखावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चलचित्रद्वारे पाच मिनिटांचा देखावा, ठाणे जिल्ह्याची जुनी ओळख ते मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे यावर आधारित चित्रफीत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये दररोज सायंकाळी ७, ८, ९  वा. ठाणेकर नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. 

या कामासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रुपये दहा कोटीहून अधिक रक्कम दिली असून ओवळा- माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून म्युझिकल फाऊंटन उभारले जाणार आहे, पण तलावामध्ये पहिल्यांदाच ठाणेकरांना या म्युझिकल फाऊंटन व उपवन घाटाचा आनंद उपभोक्ता येणार आहे.  

 आ. सरनाईक आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली, यादरम्यान म्युझिकल फाऊंटनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच राम मंदिराचा उद्घाटन सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व पूर्वीचे ठाणे ते मुख्यमंत्र्यांचे बदलत्या ठाण्याचा प्रवास याची चित्रफीत दाखवण्यात आली. या चित्रफित प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी तयार केलेली असून लाईट अँड शेडचे संस्थापक संदीप वेंगुर्लेकर यांनी त्यांना चांगली साथ दिलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post