डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील सर्वात जुने पुर्वेकडील शिवमंदिर, फडके रोडवरील श्री गणेश मंदिर आणि तब्बल ८० वर्ष पूर्ण झालेले बाजीप्रभू चौकातील श्री राम मारुती मंदिर आहे. याची नोंद डोंबिवली शहर अतिहास पुस्तकात दिसते.या मंदिरात दिनेश कुलकर्णी हे पुजारी म्हणून काम पाहत असून दरवर्षी या मंदिरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.
या पुस्तकात नोंद आहे की, डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातील मारुती मंदिर हे सर्व प्रकारच्या प्रकट सभा व लहान –मोठ्या सर्व पुढाऱ्यांची भाषणे होत असतात. केले जाणारे संकल्प, दिली जाणारी आश्वासने व चळवळींची मुहूर्तवेढ या सर्वाना साक्षीभूत असलेले एक छोटेसे पण सुबक असे श्री मारुती मंदिर याचा चौकात स्थापित झालेले आहे.श्री मारुतीचे दैवत म्हणून श्री राम, सीतामाई व लक्ष्मणही विराजमान असून संकटहारक श्री गणपतीसाठी आशीर्वादासाठी उपस्थित आहे. या मंदिरातील श्री मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
श्री शंकर गणेश कुलकर्णी हे मंदिराची सर्व व्यवस्था पाहत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. याप्रसंगी कीर्तन, प्रवचन आयोजित केले जाते. शहराच्या केंद्रबिंदू असल्याने परिसरातून वावरणाऱ्या शेकडो नागरिकांना या मंदिरातील देवतांच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. १०४० साली अतिशय छोटे असलेला मंदिर डिसेंबर १०७१ मध्ये पुनर्बांधणी करून सांप्रतच्या मोठ्या आवारात बांधले गेले. नगराच्या सर्व विकासास साक्षी असलेल मंदिर आहे.अनेक वर्ष बाजीप्रभू चौकात असलेले हे मंदिर आता समोरील जागेवर हलविण्यात आले.या मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंतीला हजारो भक्तगण दर्शनासाठी येत असतात.
