डोंबिवली ( शंकर जाधव ): डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हण सभा येथे संभाजी भिडे हे व्याख्यानमालेसाठी येत असल्याचे समजताच डोंबिवलीतील वंचित बहुजन आघाडी, व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांचा जाहीर निषेध केला.
रिपब्लिकन सेनेचे (पँथर)आनंद नवसागरे (ठाणे जिल्हा निमंत्रक/ कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष),राहुल नवसागरे(डोंबिवली विधानसभा अध्यक्ष),अर्जुन जाधव(डोंबिवली उपाध्यक्ष),नितीन साबळे(शहर संघटक),अरुण शिरसाट(डोंबिवली शहर युवा अध्यक्ष),संदीप हेरोडे(शहर युवा संघटक),वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत पगारे(डोंबिवली पूर्व अध्यक्ष),गणेश गायकवाड(डोंबिवली पश्चिम अध्यक्ष),वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष गौतम गवई,दिपक भालेराव(कबीर पेरियार मिशन, संस्था.अध्यक्ष)अक्षय वाटुडे , विकास ढिल्पे , करन लहाणे , युवराज साळवे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी निषेध केला.रविवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेतर्फे व्याख्यान मालिकेकरिता सभेचे आयोजन केले होते.त्यावर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.
संभाजी भिडे हे ब्राह्मण सभेच्या दिशेने येत असताना रिपब्लिकन सेना,वंचित बहुजन आघाडी च्यां कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विजयाच्या घोषणा देत "संभाजी भिडे चले जाव,संभाजी भिडे मुर्दाबाद" च्या घोषणा देत सरकार विरोधात घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध व्यक्त केला.संभाजी भिडे यांनी या अगोदरही महाराष्ट्रात महापुरुषांचा, संतांचा, महिलांचा, भारतीय घटनेचा,झेंड्याचा तिरंग्याचा वेळोवेळी अवमान केला आहे.मनुची व्यवस्था पुन्हा लागू व्हावी,अनिष्ट,रुढी परंपरा,अंधश्रद्धा यांना नेहमीच थारा देण्यात अग्रेसर राहिले आहेत.त्यामुळे असे कार्यक्रम रद्द झाले पाहिजेत,आयोजकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली.
कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर भाष्य केले तर त्यांच्यासह आयोजकांवर ही गुन्हे दाखल करणेकरिता त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.
