"त्या" मुस्लिम कुटुंबालाही आमंत्रण

 


डोंबिवलीतील अयोध्यानगरीही लक्ष लक्ष दिव्यांनी सजणार 

डोंबिवली ( शंकर जाधव ):   २२ जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंह देशभरातील मंत्रीगण व हजारो नागरिक उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो  निमंत्रित नागरिक अयोध्येला जाणार आहेत. मात्र सर्वांनाच या सोहळ्यात उपस्थित राहणे शक्य नाही, यांसाठी त्यांनी जवळील राम मंदिरात दर्शन घ्यावे याकरिता अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी धार्मिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

     भाजपाचे  नेते लालकृष्ण आडवाणी यांनीही राम मंदिरासाठी त्य रथयात्रा काढली होती.त्यावेळी या रथाचे सारथी हे सलीम मकाणी होते. कोरोना काळात सलीम यांचे निधन झाले. राम मंदिराचा लढा हा दीर्घ आहे. सलीम  हे तर या जगात आता नाही मात्र त्यांचं योगदान लक्षात घेता शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक तथा कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांनी सलीम यांच्या डोंबिवलीमधील कुटुंबाची भेट घेतली. सलीम यांचे भाऊ महंमद मकाणी व त्यांचे पुत्र सिकंदर मकाणी यांची भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. पाटील यांनीही त्यांच्या अयोध्यानगरी मधील श्री राम मंदिरात २२ जानेवारीला भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका व अक्षता घेऊन तालुकाप्रमुख पाटील यांनी महंमद यांना कार्यक्रमासाठी यावे अशी नम्र विनंती केली. यास महंमद यांनीही होकार देताना श्री राममंदिर होत आहे, यासाठी आनंद व्यक्त केला आणि अयोध्या नगरीच्या राम उत्सवात होऊ असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post