चीनमधील मृत्यूदर २०२३ मध्ये वाढला

 बीजिंग:  चीनमध्ये 'झिरो कोविड पॉलिसी' संपल्यानंतर मृत्यूच्या संख्येत विलक्षण वाढ झाल्याचे फोर्ब्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. फोर्ब्सने चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले आहे की २०२३ मध्ये ११ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे,  जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६,९०,००० ने अधिक आहे. चीनमध्‍ये २०२३ मध्‍ये प्रति १००० लोकांमागे ७.८७ असा मृत्यूदर आहे. जो मागील वर्षी प्रती १००० लोकांमागे ७.३७ पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. फोर्ब्सने ब्लूमबर्गच्या हवाल्याने म्हटले आहे की मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ होण्यामागे कोविड -१९ हे कारण असू शकते. दरम्यान चीनने खरी आकडेवारी लपवली असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

 फोर्ब्सच्या अहवालानुसार, जन्मदरात झालेली घट आणि मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ यामुळे चीनची लोकसंख्या सलग दुसऱ्या वर्षी घटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चीनने कोविड काळात झिरो कोविड पॉलिसीला विरोध केला होता, मात्र आकडेवारीनुसार चीनने झिरो कोविड पॉलिसी राबविली असल्याचे म्हटले जात आहे

 कोविड-१९ दरम्यान चीनने देशात झिरो कोविड पॉलिसी लागू केली होती, ज्या अंतर्गत लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले होते. चीनने आपल्या लोकांवर कडक नियम लादले होते. जेव्हा या धोरणाला विरोध झाला तेव्हा चीनने ते काढून टाकले, त्यानंतर चीनमध्ये कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ दिसून आली असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार २०२३ मध्ये चीनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे सात लाख अधिक मृत्यूची नोंद झाली असल्याचे आढळून आले असून  ही धक्कादायक आकडेवारी असल्याचे 

Post a Comment

Previous Post Next Post