आरोग्य पथक तुमच्या दारी` उपक्रमाला कल्याणापासून सुरुवात


      राज्यातही `केअर कॉल`सेवा सुरू होणार   

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना संकटानंतर आरोग्य सेवा अधिकाधिक असावी याकरता वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वपूर्व पाउल उचलले आहे. चांगल्या आरोग्य सेवांची गरज आणि रुग्णांसाठी घरापर्यंत डॉक्टर पोहोचवून वैद्यकीय सेवा मिळणार आहे.याकरता होमआरएक्सद्वारे एका कॉलवर आरोग्य पथक ताबडतोब उपलब्ध होणार आहे. एखाद्या नागरिकावर संकट आल्यास त्याने कंट्रोल रूमला काॅल करून तात्काळ मदत मिळते. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातहि रुग्णांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून केअर कॉल सेवा सुरु झाली आहे.हि सेवा कल्याण सुरु झाली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात हि सेवा सुरुकरतील अशी अशा आहे.केअर कॉलद्वार डॉक्टर रुग्णाच्या घरी पोहोचेल अशी माहिती सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. धीरज खडकबाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  



कल्याण येथे मकरसंक्रांतचे औचित्य साधून होम आर एक्स ॲप लाँच करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, युवा नेते सिद्धेश कपिल पाटील, भाजप कल्याण शहरअध्यक्ष वरूण पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, जनरल फिजीशियन डॉ. विवेक भोसले, डॉ. नरेंद्र जग्यासी, डॉ एस.पी. काकरमठ, कंपनीचे संस्थापक सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. धीरज खडकबाण, अमेरिकेतील सुप्रसिद्ध उद्योगपती चारुदत्त खडकबाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होम आर एक्सचे क्रिएटिव्ह पार्टनर ब्रँडबॉन्ड निलेश यांनी केले. यावेळी डॉ. धीरज खडकबाण म्हणाले, आमची विश्वासार्ह सेवाच आम्हाला विश्वासार्ह बनवते. आरोग्यसेवेचा स्त्रोत, सुसंगत प्रदान करणे आणि अखंडित वैद्यकीय सेवा ही मूल्य आम्ही जपणार आहोत. वार्षिक दहा लाख रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. उच्च-गुणवत्तेमध्ये पायनियर होण्यासाठी भारतभर वैद्यकीय सेवा देऊन आरोग्यामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करणे ही आमची दूरदृष्टी आहे. विशेष म्हणजे यात डॉक्टर आपल्या घरी येतीलच शिवाय हॉस्पिटलीयझेशन, लॅब टेस्ट, सिटीस्कॅन, एमआरआय सपोर्ट आणि सवलती अशा विविध प्रकारच्या अतिरिक्त सेवांचा देखील समावेश आहे.


Post a Comment

Previous Post Next Post