आमदार लहुजी कानडे यांचा आरोप
श्रीरामपूर, (प्रतिनिधी) : विधिमंडळात कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतो, मागासर्गीयांसाठी बोलतो त्यावेळी तिथे बसणाऱ्याना प्रतिनिधींना ते रूचलेल नसत, नागपूर अधिवेशनात विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न मांडला तर ते म्हणतात की तेच तेच बोलता.मी म्हणालो त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न मांडणारच.मात्र सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांचे प्रश्न अजांड्यावरून गायब केले आहेत असा आरोप श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे यांनी केला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त व्हीआयपी गेस्ट हाऊस ,श्रीरामपूर येथे बहुजन शक्ती समाजिक संघटनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी बहुजन शक्तीचे अध्यक्ष परेश मोटे होते.कार्यध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी आमदार लहुजी कानडे, मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दीपक पवार, ॲड शिरतुरे ॲड मुक्तार शेख, प्रा.झिने सर, सचिन खंदारे, इमरान शाह, सोमनाथ पवार आदी मान्यवार उपस्थित होते.
यावेळी आमदार लहुजी कानडे म्हणाले की, भारत देशाला कधी ही लोकशाही नावाची गोष्ट २६ जानेवारी १९५० पर्यंत माहिती नव्हती इथल्या लोकांना आपण सर्व बंधू आहोत समान आहेत हे ही माहित नव्हत. मात्र हे संविधानिक अधिकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. डॉ. बाबासाहेबांनी संविधान सभेत जे भाषण केलं आहे, त्याच्या प्रति तरुणांना वाटल्या पाहिजेत.अशी इच्छा वेक्त करत आमदार कानडे म्हणाले की, आंबेडकरांमुळे सर्वाना लोकशाही मिळाली आहे. परंतु प्रत्येक्षात सरंजामशाही आहे मूठभरांची हुकूमशाही आहे.महत्वाच्या प्रश्नांवर किमान एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल बहुजन शक्ती संघटन हे समजून एक विवेकी राष्ट्रीय संघटन उभ करील अशा शुभेच्छा आमदार कानडे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक पवार म्हणाले की,आज भारताचे संविधान धोक्यात आले आहे. कामगार कष्टकरी,शेतकरी पत्रकार इतकंच न्हवे तर सर्वसामान्य जनतेचे अधिकार सरकारने काढून घेतले आहेत. सरकार आणि भांडवलदार. यांनी भारतीय जनतेचे संविधानिक अधिकार काढून घ्याला सुरुवात केली असून देशात हुकूमशाही आणत आहे. आपण सर्व युवकांनी बहुजन शक्ती समाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा रक्षणासाठी पुढे आले पाहिजे असे आव्हान ज्येष्ठ पत्रकार पवार यांनी यावेळी केले.
