डोंबिवलीत ६२ हजार पुस्तके रचून उभारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती

डोंबिवली ( शंकर जाधव ):  डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात पै लायब्ररी ,डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार ,डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  तब्बल ६२ हजार ५०० पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे संपूर्ण मंदिर संपूर्ण उभे करण्यास तीस दिवस 30 दिवस असून  मंदिर ५० फूट उंच, ८० फूट रुंद व ४० फूट लांब आहे.

बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले. येत्या १९ तारखेला पुस्तक आदान प्रदानचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.या प्रतिकृतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post