डोंबिवलीत होणार विश्वविक्रमी दिपोत्सव

 


  • खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्रीराम उत्सवाच्या निमित्ताने दिपोत्सव
  • लाखो दिव्यांनी उजळणार प्रभू श्रीरामाची प्रतिकृती
  •  कल्याण लोकसभा मतदारसंघातील नऊ ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई

 डोंबडोंबिवली ( शंकर जाधव ) :  प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत असून त्यानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात विश्वविक्रमी दिपोत्सव साजरा केला जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात १ लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे. या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणूनही नोंद केली जाणार आहे. यावेळी महाआरती केली जाणार असून कल्याण लोकसभा मतदार संघात नऊ ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी होणारा या दिपोत्सवाची विश्वविक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून हा दिपोत्सव देशातील सर्वात मोठा दिपोत्सव ठरण्याची आशा आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या दिपोत्सवाच्यावेळी मैदानात उपस्थित राहतील. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. 

     कार्यक्रमानिमित्त संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मोफत डाळ आणि साखरेचे वाटप करण्यात येते आहे. लोकसभा मतदारसंघातील सुमारे पाच लाख कुटुंबापर्यंत या जीन्नसाचे वाटप केले जाते आहे. त्यात प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती, पुस्तकांचे मंदिर, विविध दहा ठिकाणी विद्युत रोषणाई, रामायण कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा शेजारील मैदानात भव्य दिपोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारी रोजी सायंकाळी या मैदानात भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. या रांगोळीवर १ लाख ११ हजार १११ दिव्यांची आरास केली जाणार आहे. हे दिवे प्रज्वलीत केल्यानंतर प्रभू श्रीरामाचे चित्र विहंगम दृश्य डोळ्यांत साठवता येणार आहे. या दिपोत्सव कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

   प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघाला एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या मध्ये ९० फीट रस्ता खारेगाव कळवा, कळवा नाका,शिळफाटा जंक्शन, फडके रोड डोंबिवली, चक्की नाका कल्याण, गरडा सर्कल डोंबिवली, सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली, गोल मैदान, चालीय मंदिर, झुलेलाल मंदिर उल्हासनगर, बायपास रस्ता शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी ही विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post