दुबई. इराणने पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र टाकल्याचे इराणच्या प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बलुच येथील दहशतवादी गट 'जैश अल अदाल'च्या दोन तळांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराक आणि सीरियामध्ये क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर इराणने ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैश अल अदालच्या दहशतवादी गटाने यापूर्वी पाकिस्तानच्या सीमा भागात इराणी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. सध्या इराणकडून या हल्ल्यांबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करून बलुच दहशतवाद्यांचे दोन अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत म्हटले आहे.
जैश अल-अदलची स्थापना २०१२ मध्ये झाली असून तो एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानमध्ये स्थित सीमापार दहशतवादांना प्रोत्साहन देतो तसेच तेथे दहशतवादी कारवाया देखील करत असतो.
इराण सीमा भागात अतिरेक्यांच्या मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू असून त्याविरोधात इराणने आक्रमकता दाखवली आहे. दहशतवाद्यांनी यापूर्वी बॉम्बस्फोट आणि इराण सीमा पोलिसांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इराणकडून ड्रोन अथवा क्षेपणास्त्र हल्ले होणे हे दहशतवादाविरोधात उचललेले एक उत्तम पाऊल असे म्हटले जात आहे.
पाकिस्तान हा सुन्नी बहुल बंडखोरांना आश्रय देत असल्याचा इराणचा दीर्घकाळापासून संशय आहे. पाकिस्तान हे आपले प्रादेशिक प्रतिस्पर्धी सौदी अरेबियाच्या इशाऱ्यावर हे करत असल्याचा इराणचा संशय आहे. तथापि, इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात गेल्या मार्चमध्ये चीनच्या मध्यस्थीने केलेल्या शांतता करारावर सहमती दर्शविली.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)