ट्विंकल खन्ना पदवीधर झाली

 


नवी दिल्ली : अक्षय कुमारची (Akshay kumar) पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्न ( Twinkle khanna) अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर लेखिका बनली होती. ट्विंकल खन्नाने आतापर्यंत चार पुस्तके लिहिली आहेत. मात्र आता तिने आपले शिक्षण पूर्ण करत लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये पदवी देखील मिळवली आहे. ट्विंकलने पदवी घेतल्याचा फोटो अभिनेता अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

 लग्नानंतर फिल्मी जगताला अलविदा केल्यानंतर आपले शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले होते. तिने एका मुलाखतीत सांगत आपला मुलगा आरवसह आपण देखील विद्यापीठात प्रवेश अर्ज केला आहे. ट्विंकलने लंडन विद्यापीठात फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता. 

दरम्यान कोरोना काळात अभ्यासात व्यत्यय आल्यानंतर तिने कोरोनानंतर पुन्हा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये  ट्विंकलने तिचे शिक्षण पूर्ण करत फिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्राममध्ये पदवी मिळवली आहे. ट्विंकलल पदवी मिळाल्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अक्षय कुमारने बायकोच अभिनंदन करत दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला सांगितले होते की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस मला आश्चर्य वाटले, पण ज्या दिवशी मी तुला एवढी मेहनत करताना पाहिले त्यावेळेस घर, करिअर, स्वत: आणि माझी मुले, तसेच पूर्ण विद्यार्थी जीवन सांभाळत असताना तुझा अभिमान वाटत होता, त्याचबरोबर मी एका सुपर स्त्रीशी लग्न केल्याचा आनंद देखील झाल्याचे अक्षयने म्हटले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post