१५७ वृक्षांचे पुनर्रोपणाचे आदेश असताना सुद्धा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
दिवा, (आरती मुळीक परब) : ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समिती अतंर्गत शिळ - दिवा रस्ताच्या रुंदीकरणासाठी शेकडो वृक्षांची कत्तल सुरू आहे. त्यातील १५७ वृक्षांचे पुनर्रोपणाचे आदेश दिले असताना सुद्धा पालिका अधिकाऱ्यांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
रस्ता रुंदकरणात बांधीत १५७ वृक्षांचे पुनर्रोपण करून ते जिवंत राहण्याकरता निगा, देखभाल करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समिती क्षेत्रामधील मोकळ्या जागा, रस्ताच्या दुतर्फा जागा अथवा आरक्षित भूखंड इत्यादी वृक्षारोपणाकरीता योग्य असलेल्या जागा शोधून तेथे झाडे लावली पाहिजेत. पण योग्य ठिकाणावर झाडे लावण्याच्या कामा करता एजन्सी, संस्था मार्फत कामे करून घेण्याची सर्व जबाबदारी पालिका कार्यकारी अभियंता यांची असली तरी त्यांचे या कामात होणाऱ्या दुर्लक्षामुळे ते वृक्ष मरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
झाडांचे पुर्नवृक्षारोपण व तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या प्रित्यर्थ भरपाई वृक्षाच्या अंदाजे वया इतकी करणे आवश्यक आहे. त्यानुसार वृक्षप्राधिकरण अधिकारी सुचित करतील असे बाधित वृक्ष तोडणे वा वृक्षार्रोपण करण्या बाबत वृक्षांच्या लागवडीसाठी रस्ता दुतर्फा तथा विकसित करणाच्या जागेवर किमान २ फूट × २ फूट × २ फूट आकारमानाच्या खड्डायाची जागा व २ खड्डयांमध्ये किमान १५ फूट अंतर राहील याची दक्षता संबंधित कामाकरिता कार्यकारी अभियंत्याने घ्यायची आहे.
पण अशा बांधीत वृक्षांचे पुनर्रोपण करत असताना हे नियम पाळले जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. तसेच पुनर्रोपण केलेल्या वृक्षांना खत, पाणी सुद्धा दिले जात नसून त्यांची निगा ही व्यवस्थित घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ती झाडे मृत्यूमुखी पडत आहेत. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसे शिळ- देसाई विभाग अध्यक्ष शरद गुणाजी पाटील यांनी केली आहे.


