नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शनिवारी किमान तापमान ८.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ते सामान्य तापमानापेक्षा दोन अंशांनी अधिक होते. शनिवारी हवामान खात्याने दिल्लीत पुन्हा थंडीचा दिवस जाहीर केला. येथे कमाल तापमान १६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असे सांगितले.
दिल्लीत दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पालममध्ये सर्वात वाईट स्थिती अनुभवस मिळाली. सकाळी ५.३० वाजता येथील १००० मीटरपर्यंत धुके जाणवतहोती. तर सफदरजंगमध्ये सकाळी ८ वाजता दृश्यतेची पातळी ५०० मीटर होती. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतात दिल्लीहून धावणाऱ्या सुमारे १४ गाड्या उशिराने धावल्या. दिल्लीला पोहोचणारी ट्रेन सहा तास उशिराने अखेरीस पोहोचली.
धुक्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाल्याचे दिसून आले. IGI विमानतळावर सकाळी ८ वाजता सुमारे ३० उड्डाणे उशीराने झाल्याचे पहायला मिळाले.
.jpeg)
.jpeg)