विशाखापट्टणम: ( Indian Cricket Team) भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. सर्वात जलद १५० कसोटी बळी घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. बुमराहने केवळ ३४ कसोटी सामन्यात १५० विकेट घेतल्या आहेत.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० विकेट्स घेणारा आर अश्विन पहिल्या स्थानावर आहे. अश्विनने केवळ २९ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत रवींद्र जडेजाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाने ३२ कसोटी सामन्यात १५० धावा करण्याचा पराक्रम केला होता. अनिल कुंबळे आणि इरापल्ली प्रसन्ना या दिग्गज फिरकी गोलंदाजांची बरोबरी करत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर आहे. या तिघांनी ३४ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.
आशियाई वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे तर बुमराहच्या विक्रमाच्या पुढे फक्त दिग्गज वकार युनूस आहे, ज्याने केवळ २७ कसोटी सामन्यांमध्ये १५० बळी घेतले होते. पाकिस्तानच्या इम्रान आणि शोएब अख्तर यांचाही या खास क्लबमध्ये समावेश आहे.
सर्वात जलद १५० कसोटी बळी घेणारा भारतीय
- आर अश्विन २९ सामने
- रवींद्र जडेजा ३२ सामने
- जसप्रीत बुमराह ३३ सामने
- अनिल कुंबळे ३४ सामने
- इरापल्ली प्रसन्ना ३३ सामने
१५० कसोटी विकेट घेणारा सर्वात वेगवान आशियाई वेगवान गोलंदाज
- वकार युनूस (पाकिस्तान) – २७ सामने
- जसप्रीत बुमराह (भारत) - ३४ सामने
- इम्रान खान (पाकिस्तान) – ३७ सामने
- शोएब अख्तर (पाकिस्तान) – ३७ सामने