गरीब विद्यार्थ्यांनाही मोफत शालेय साहित्य
डोंबिवली ( शंकर जाधव ): कला, साहित्य, खेळ, गायन, वादन, शैक्षणिक,समाजिक, पत्रकारिता,चित्रपट सृष्टी,पोलीस खाते यात डोंबिवली शहराचे नाव महाराष्ट्रातचा नव्हे तर देशभरात उंचाविले. अटकेपार झेंडा रोविलेल्या डोंबिवली शहरातील या रत्नांना रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची महाराष्ट्रातील `सह्याद्री समाजिक संस्था`च्या वतीने सह्याद्री रत्न पुरस्कार` प्रदान करून गौरविण्यात आले. डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप व गुणगौरव करण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, सुलेखा गटकळ, मोहन बडगुजर, पै फ्रेडस लायब्ररी संस्थापक अध्यक्ष पुंडलिक पै, स्वप्नाली चव्हाण,बाजीराव माने यांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या डोंबिवलीतील रत्नांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते `सह्याद्री रत्न पुरस्कार`प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या सोहळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय पावशे, मनसे डोंबिवली शहरध्यक्ष राहुल कामत, दत्ता वझे, सुचिता पाटील,जयदीप दळवी, रिपाईचे माणिक उघडेआणि रामचंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ मोरे, प्रमुख सल्लागार सुलेखा गटकळ,भीमराव गुंड,सचिव बाजीराव माने, पदाधिकारी समाधान लोकरे,रुपेश काळंगे,चंद्रकांत जगताप,सचिन बेडेकर,लक्ष्मण कदम, संजय कवडे,सुनील पाटील, प्रदीप पवार, प्रतिक साबळे,तानाजी बुद्रुक, देवराम गुंड, निवास कवडे, नीरज भोसले, श्रीहरी बुद्रुक, शिरीष तळोदे, ज्ञानेश्वर भोसले, चक्रधन वाघ, अशोक मोरे, रमेश टावरे,अनिल तावडे,रामकृष्ण पाटील,सुर्यकांत निंबाळकर, देविदास शिंदे, रुपेश व भीमा आदींनी अथक मेहनत घेतली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मोरे म्हणाले, सह्याद्री समजीन संस्थेचे हे दुसरे वर्ष असून संस्थेने अनेक समाजिक उपकरण राबवील आहे. यापुढे असेच समाजिक उपक्रम राबवीत समाजसेवेत खारीचा वाटा उचलीत.तर उपस्थित मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात खडतर प्रवास करत यशाच्या शिखराकडे पोहोचण्याबाबत माहिती देताना उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.