पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स, कार्ड मशीनचा समावेश
मुंबई / ( तुषार चव्हाण) : पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांचे मेड-इन-इंडिया क्यूआर कोड, साऊंडबॉक्स आणि कार्ड मशिन १५ मार्च २०२४ नंतर देखील नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एफएक्यू रीलीज केल्यानंतर याची पुष्टी मिळाली आहे.
कंपनीने पूर्वीप्रमाणे मर्चंट सेटलमेंट्स सुरू राहण्यासाठी आपले नोडल खाते ॲक्सिस बँकेमध्ये (एस्क्रो खाते उघडून) हस्तांतरित केले आहे. हे व्यवस्थापन ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेली कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) च्या नोडल खात्याला रिप्लेस करण्याची अपेक्षा आहे. कंपनी त्यांची सहयोगी उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसोबत या खात्याचा वापर करत होती. ओसीएलची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्विसेस लि. (पीपीएसएल) तिच्या स्थापनेपासून ॲक्सिस बँकेच्या सेवांचा वापर करत आहे.
पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी देखील X (मागील ट्विटर) चा संदर्भ देत याबाबत पुष्टी दिली आणि वापरकर्त्यांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
