डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.या घटनेने काही दिवस कल्याण पूर्वेकडील वातावरण तणावाचे असल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.सोमवारी आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली.याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनीं काही संशयीतांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेच्या तिसाई परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड यांचे केबलचे कार्यालय आहे.सोमवारी पाच ते सहा जणांनी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या टोकळ्यांनी कार्यालयाची तोडफोडही केली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार ते पाच संशयीतांना पालिसांनी ताब्यात घेतले.