मध्य रेल्वेकडून नागरिकांचे हाल

  •  जलद गाड्या ४५ मिनिटे लेट
  • भांडुपनंतर गाड्या खोळंबल्या 

ठाणे: शनिवारी मध्य रेल्वेच्या मोटरमनने केलेल्या आंदोलनाचा फटका रविवारी नागरिकांना बसला. रविवारी ठाण्यातून ३.२७ सुटलेली ट्रेन भांडूप स्थानकाच्या अलिकडे ३०-४५ मिनिटे थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच लेट त्यात कोणतीही सूचना न देता एकाच जागेवर गाडी थांबवून ठेवल्याने नागरिंकाचा रविवार हालअपेष्टामध्ये गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दुपारी ३ नंतरच्या सगळ्या फास्ट गाड्या भांडुपनंतर रखडल्याचे पहावयास मिळाले. फास्ट मार्गावरील गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तर धीम्या गतीच्या गाड्यांना अधिक प्राधान्य दिले जात होते. ठाणे स्थानकात ३.०८ ३.११, ३.२७ ची गाडी भांडुप स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या, याबाबत रेल्वे प्रशासन अथवा रेल्वे मोटरमनकडून कोणतीही सूचना दिली गेली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. गाड्या बराच वेळ थांबून राहील्याने काहींनी अंतर चालत पार करत कर्तव्यावर पोहोचण्याचा निर्णय घेतल्याने नागरिक रेल्वेगाडीमध्ये कमी आणि ट्रॅकवर अधिक दिसले. प्रत्येक गाडी ही ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लेट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
    आठवड्यातून एक दिवस बाहेर फिरण्यासाठी आप्तेष्ठांना भेटण्यासाठी मिळत असल्यामुळे रविवारी मेगाब्लॉक असताना देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असतात. आपला प्रवास जलद व्हावा यासाठी अनेकजण रेल्वेचा मार्ग अवलंबतात, मात्र आजचा रविवार नागरिकांसाठी त्रासदायक ठरला. आधीच लेट असणाऱ्या मध्यरेल्वेच्या गाड्या रविवारी लडखळत सुरू होत्या. फास्ट गाड्या ठाणे स्थानक सोडल्यानंतर गडगडल्याचे चित्र पहावयास मिळाले. सगळ्या फास्ट गाड्या भांडुप स्थानकापासून लायनीत उभ्या असल्याचे पहायला मिळाले. 


Post a Comment

Previous Post Next Post