मराठी राजभाषा दिनानिमित्त पै फ्रेंड्स लायब्ररीचा उपक्रम

ठाणे जिल्हातील १०० शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय सुरू करणार

डोंबिवली ( शंकर जाधव ) : वाचन संस्कृती जोपाण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे डोंबिवलीतील पुंडलिक पै यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त ठाणे जिल्हातील १०० शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय सुरू करणार करणार आहेत.गेली ३७ वर्ष वाचकांच्या सेवेत असलेली पै फ्रेंड्स लायब्ररी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम करत आपलं वेगळेपण जपत असत असल्याचे पै फ़्रेंडन्स लायब्ररीचे संस्थापक पुंडलिक पै यांनी सांगितले.

नुकतच लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तक आदान- प्रदान प्रदर्शन हा एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला. २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम वाचनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हातील १०० शाळांमध्ये मराठी पुस्तकांचे वाचनालय पै फ्रेंड्स लायब्ररी स्थापन करणार आहे.लवकरचं या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असून वर्षभरात १०० शाळांमध्ये वाचनालय सुरू करण्याचा मानस असल्याचे पुंडलिक पै यांनी सांगितले. या उपक्रमाला अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभणार आहे. यासाठी शाळा पै फ्रेंड्स लायब्ररी च्या समितीच्या माध्यमातून निवडण्यात येतील.



Post a Comment

Previous Post Next Post