पक्षाने सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढवीन -सुषमा अंधारे

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  मला पक्षाकडून सांगितलं कि आगामी लोकसभा निवडणुकीत उभी राहीन असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी मुक्त संवाद अभियानांतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा कल्याण दौरा होता. दौरादरम्यान त्यांनी अग्रवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी शहर शाखेत पत्रकार परिषद घेतली.

  उपनेत्या सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, माझं नाव चर्चेत आहे पण मला त्याबाबत अधिकृत निरोप नाही मला फक्त काम करायचे आहे. .पक्षाने मला सांगितले तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेन. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असं वाटत नाही. आम्हाला त्यांच्याशी समोर जाताना फार मोठा आव्हान आहे असं वाटत नाही. पक्षाने मला अजून सांगितलं नाही असं स्पष्ट केलं नाही.

     सरकारने मनोज जरांगे पाटील प्रकरणी एसआयटी चौकशी लावण्याचे आदेश दिले आहे. सरकारने ही चौकशी करायला हरकत नाही मात्र त्यासोबतच मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण एसटी आरक्षणाच्या लढ्यात जे तीन-चारशे लोक मेलेत त्यांचे एसआयटी चौकशी सरकार लावणार आहे का ? सरकारला जर एवढी एसटी चौकशी लावण्याचे हौस असेल तर भीमा कोरेगावच्या एसआयटी चौकशीचे काय झालं ? यावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे.

      उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यातील गोळीबारप्रकरणी सुषमा अंधारे म्हणाल्या, पत्रकार परिषदेत पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात. हे दोघेही सरकार पक्षातले आहेत.आत्तापर्यंत अफरातफरी गोंगाट आणि गोंधळ झाल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले.त्याचे एसआयटी चौकशीचा काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातामध्ये जे 28 ते 30 लोक गेले. एकाच वेळेला हे सगळे अपघात होतात याचे एखादे चौकशी सरकारी लावणार आहे का ? 

      एसआयटी चौकशी लावण्याचा जे काही नाटक सरकारकडून सुरू आहे ,फडणवीस साहेबांनी कही पे निगाहे कही पे निशाणा करू नये. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निशाणा जर थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर असेल तर ते थेट सभागृहात बोलावं, आडून-अडून राजेश टोपे ,शरद पवार, राजेश टोपे, उद्धव ठाकरे असे नावे न घेता थेट निशाणा साधावा, थेट बोलावं कारण जर तुमचे काही आक्षेप असतील तर मला असं वाटतं की त्या सगळ्या घडामोडींमध्ये मंगेश चिवटे सारख्या माणसाचा वावर पण फार महत्त्वाचा होता.कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे. 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट ) शहर प्रमुखाला गोळ्या घालाव्यात याचा अर्थ सत्ताधाऱ्यांमधला अंतर्गत गॅंगवर किती टिकेला पोहोचला हे दिसून येते. या परिस्थितीत निश्चितपणे वाटतं येणारे निवडणूक डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post