जागतिक कर्करोग दिन २०२४ चे औचित्य
मुंबई : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल कॅन्सर रेजिस्ट्री प्रोग्राम (आयसीएमआर-एनसीआरपी) च्या अंदाजानुसार देशातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२५ मध्ये १५.७ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलने जागतिक कर्करोग दिन २०२४ च्या निमित्ताने ४ फेब्रुवारीला आयकॉनिक कॅन्सर रिबनच्या स्वरूपात एक अद्भुत मानवी साखळी तयार (ह्युमन चेन) केली. कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि या गंभीर आजाराविरुद्ध रुग्णालय कशाप्रकारे वचनबद्धतेने लढा देत आहे यावर प्रकाश टाकणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमात कर्करोगाच्या रूग्णांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच त्यांनी प्रतिकात्मक कर्करोग रिबन तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यक्रमात पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलने केवळ कर्करोगाच्या रुग्णांना सहभागी करुन घेतले नाही तर कर्करोगाच्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आमंत्रित केले. रुग्ण आणि आरोग्यसेवा कर्मचारी दोघेही कर्करोगाविरुद्ध लढा देत असतात, त्यामुळे या दोन्ही घटकांना एकत्र आणून “आशा आणि लवचिकपणाचा त्याग कधीही करु नये” असा एकत्रित संदेश देणे हे रुग्णालयाचे उद्दिष्ट आहे.
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ गौतम खन्ना हे कार्यक्रमाबद्दल अतिशय उत्साहात म्हणाले की, “या जागतिक कर्करोग दिनानिमित्त निर्माण केलेली ही मानवी साखळी कर्करोगाच्या आव्हानांवर विजय मिळवण्याच्या आपल्या दृढ समर्पणाची आकर्षक अभिव्यक्ती ठरणार आहे. रूग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आमच्या प्रतिष्ठित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एकत्र आणून सहयोगात्मक यश, अतूट सहयोग आणि लवचिकतेचा प्रभावी संदेश देणे हे आमचे ध्येय आहे. रुग्णांवर उपचार करुन भविष्यात त्यांना कर्करोगमुक्त करण्याची आमची दृढ वचनबद्धता या मानवी साखळीच्या निर्मितीमधून दिसून येते.
भारतात नऊपैकी एका व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका असतो. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चने असा अहवाल दिला आहे की पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग, तर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळतो. लहान मुलांना (८-१४ वर्षे) होणाऱ्या कर्करोगामध्ये लिम्फॉइड ल्युकेमियाचे प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणजे मुलांमध्ये २९.२% आणि मुलींमध्ये २४.२% एवढे प्रमाण आहे. असा अंदाज व्यक्त केला जातो की २०२५ पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये १२.८% वाढ होण्याची शक्यता आहे.
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीच्या मेडिसिन आणि ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आशा कपाडिया आपले बहुमूल्य मत व्यक्त करताना म्हणाल्या “आम्ही रुग्णांशी दररोज संवाद साधत असतो, त्यामुळे असे म्हणायला हवे की आम्ही कर्करोगाच्या गंभीर परिणामाचे साक्षीदार आहोत. कॅन्सर रिबनची निर्मिती करणारी मानवी साखळी कर्करोगावरील उपचाराच्या आणि प्रतिबंधात्मक उपायाच्या रुपरेषेला आकार देण्यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न करण्याचे महत्व पटवून देते. एकत्र येऊन आम्ही उत्तमप्रकारे जनजागृती निर्माण करण्याचा आणि कर्करोगाचा प्रभाव कमी होईल असे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक निरोगी आरोग्याद्वारे आपल्याला भविष्यात आरोग्यसंपन्न कसे राहावे यासाठी मार्गदर्शन मिळते."
पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर म्हणजे हिंदुजा ग्रुपचाच एक भाग असून त्यांनी १९५१ मध्ये क्लिनिक म्हणून कामाला सुरूवात केली. सात दशकांहून अधिक काळ या संस्थेने सर्वांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरवली जावी यासाठी काम केले आहे. या संस्थेअंतर्गत सध्या दोन युनिट्स आहेत, एक युनिट माहीम येथे असून त्यामध्ये ४०० बेड्स आहेत आणि दुसरे खार येथे असून तिथे१०० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. २०२० आणि २०२१ मधील न्यूजवीक वर्ल्डच्या बेस्ट हॉस्पिटल सर्व्हेमध्ये हे रुग्णालय पश्चिम भारतात १ल्या, भारतातील खासगी रुग्णालयांमध्ये ३ ऱ्या आणि भारतातील सर्व रुग्णालयांमध्ये ६ व्या स्थानावर होते.