हिबा नवाब उर्फ झनकने केला याबाबत खुलासा
आगळावेगळा आशय देण्याकरता आणि आजवर अस्पर्शित राहिलेल्या विषयांना हात घालण्यात ‘स्टार प्लस’ वाहिनीचा हातखंडा आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीने प्रेक्षकांकरता ‘झनक’ ही नवी मालिका पेश केली आहे. हिबा नवाब या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या झनकची भूमिका साकारत आहे. कृशल आहुजा ऊर्फ अनिरुद्ध मुख्य नायकाची भूमिका करत आहे आणि चांदनी शर्मा या मालिकेत अर्शीच्या भूमिकेत दिसणार आहे.
झनक ही अशा एका हुशार मुलीची कथा आहे, जी कष्ट करीत, अडथळे पार करून मोठी होते आणि नृत्यांगना बनण्याची आकांक्षा बाळगते. निर्मात्यांनी अलीकडेच या मालिकेचा एक रंजक प्रोमो प्रदर्शित केला, ज्यात प्रेक्षकांना आगामी भागांत अपेक्षित असलेल्या प्रमुख नाट्याची अप्रत्यक्ष सूचना जणू मिळाली होती. नव्या प्रोमोमध्ये झनक आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाविषयीचे सत्य सर्वांसमोर येत असताना अर्शी आणि अनिरुद्ध यांचा साखरपुडा होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही बाब कुटुंबातील सर्वांनाच धक्का देणारी आहे. झनक आणि अनिरूद्ध यांच्या लग्नासंबंधीचे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे नाट्य उलगडते ते पाहणे रंजक असेल. झनक आणि अनिरुद्ध या परिस्थितीचा कसा सामना करतात, हेही पाहण्यासारखे आहे!
*या संदर्भात झनकची भूमिका साकारणारी हिबा नवाब मनोगत व्यक्त करताना म्हणाली की,* अखेर सत्य सर्वांसमोर आले आहे: झनक आणि अनिरुद्ध विवाहित आहेत, तर अर्शी आणि अनिरुद्ध लग्न करत आहेत. सत्य तेजसने उघड केले आहे, कारण त्याने झनक आणि अनिरुद्धला धमकी दिली होती. झनक आणि अनिरुद्ध यांच्या कुटुंबासमोर आलेल्या वास्तवाचे या मालिकेत उलगडणारे मोठे नाट्य प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनिरुद्ध झनकवर नाराज आहे, पण त्याच वेळी तो झनकला इतरांच्या वाईट हेतूपासून वाचवतोय."
आज ‘झनक’मध्ये उलगडणारे नाट्य पाहा. लीना गंगोपाध्याय निर्मित ‘झनक’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार रात्री साडेदहा वाजता प्रसारित होईल.