माजी नगसेवक टावरे यांनी मानले आभार
डोंबिवली ( शंकर जाधव ): २०१९ सालापासून समाज मंदिर आणि व्यायामशाळा बनविण्यासाठी प्रतीक्षा करत होतो. आता प्रतीक्षा संपली असून मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी २५ लाख रुपये निधी दिल्याने कामाला गती आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही याकरता निधी उपलब्ध करून दिला होता.आता हे काम काही दिवसात पूर्ण होईल. त्याबद्दल मी मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ, श्रींकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानतो असे माजी नगसेवक मंदार टावरे यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सांगितले.
आयरे गावातील समाजमंदिर आणि व्यायामशाळेच्या विकसित आणि सुशोभीकरणा करण्यासाठी मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगसेवक टावरे यासह गावकऱ्यांनी आभार मानले.मनसे आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.यावेळी माजी नगसेवक टावरे म्हणाले,आयरे गावातील ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचे स्वागत असो. आमदार पाटील हे नेहमीच आयरेगावाच्या पाठ्शी उभे राहिले. मला सांगायला आनंद होतो कि, बालाजी गगार्डन जवळील आयरे गावातील जो रस्ता होता, त्यासाठी आमदार पाटील यांनी २५ लाखाचा निधी दिला होता.
पहिल्या दिवसापासून ते रस्ता पूर्ण होईपर्यत आमदार पाटील हे माझ्यासोबत उभे होते. आमदार रविंद्र चव्हाण ह सोबत होतेच त्याच बरोबर मनसे आमदार पाटील हेही उभे राहिले. गावदेवी मंदिरासाठी १० लाख निधी उपलब्ध करून दिला.समाजमंदिराचे २०१७ साली श्रीफळ वाढविले होते. ही जागा ताब्यात येईपर्यत २०१९ साल उजाडले. २०१९ साली माझ्या नगसेवक निधीतून दोन वर्षाचा दोन वर्षाचा ७० लाख निधी दिला. त्यांतर कोरोना महामारी आल्याने केंद्र सरकारने देशात टाळेबंदी जाहीर केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही ३० लाख निधी दिला. यानंतर समाजमंदिर आणि व्यायामशाळेचे काम सुरु होते. मात्र काम थांबले. दोन वर्षापसून प्रतीक्षा होती. मनसे आमदार राजू पाटील यांनी निधी दिल्याने या कामाला गती आली. या समाजमंदिराशी आयरेगावातील भूमिपुत्रांच्या भावना जोडल्या आहेत.पुढील चार पाच महिन्यात समाजमंदिर आणि व्यायामशाळेचे काम पूर्ण होईल आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते याचे लोकापर्ण होईल.